Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या चित्रपटात रणवीर सिंगची एन्ट्री, या भूमिकेत दिसणार अभिनेता


 साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा ' पुष्पा: द रुल' (Pushpa: The Rule) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या काही महिन्यांपूर्वी अल्लू अर्जुनचा लूक समोर आला होता, जो पाहून चाहते खूप खूश झाले होते. चित्रपटातून समोर आलेल्या अल्लू अर्जुनच्या लूकवरून हे स्पष्ट झाले आहे की पुष्पा २ (Pushpa 2) या चित्रपटात अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाशी बॉलिवूडचे नाव जोडले जाणार आहे.

अभिनेता रणवीर सिंग बऱ्याच दिवसांपासून हिट चित्रपटाच्या शोधात होता. २०२२ मध्ये रिलीज झालेला रणवीर सिंगचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. दरम्यान, रणवीर सिंगचे नाव अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द रुल' या चित्रपटाशी जोडले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंग या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग पोलिसाची भूमिका साकारणार आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट रणवीर सिंगच्या करिअरला पुन्हा जिवंत करेल, असा विश्वास आहे. 'पुष्पा: द रुल' या चित्रपटात रणवीर सिंगच्या एन्ट्रीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रणवीर सिंग सध्या त्याच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या प्रेमकथेमुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत आलिया भट दिसणार आहे.
पुष्पानं केली २०० कोटींहून जास्त कमाई
रश्मिका मंदान्ना आणि अल्लू अर्जुन यांचा 'पुष्पा: द रुल' हा चित्रपट यावर्षी म्हणजेच २०२३ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या पार्टीच्या यशानंतर निर्मात्यांना 'पुष्पा: द रुल' चित्रपटाकडून मोठ्या आशा आहेत. 'पुष्पा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींहून अधिक कमाई केली होती. हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला.